श्री सद्गुरु सत्संग मंडळतर्फे जिल्ह्यात प्रसार सेवा आयोजन.

श्री. सद्गुरू सत्संग मंडळतर्फे  जिल्ह्यात प्रसार सेवा आयोजन.




जनसंघर्ष न्युज 

श्री.सद्गुरू सत्संग मंडळ, धुळे जळगाव तर्फे परम पूज्य  सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने धुळे सामुदायिक प्रसार सेवा आयोजित करण्यात आली आहे.
ही सेवा दिनांक १४ ऑगस्ट ( ऐच्छिक ) शिरपूर येथे व १५ व १६ ऑगस्ट  (अर्धा दिवस) २०२६ रोजी धुळे येथे मंडळातील सर्व दत्त भक्त घरोघरी जाऊन वेदविद्या संवर्धनाचे तसेच परम पूज्य सद्गुरुंचे मार्गदर्शन करणारी ( गुरुवाणी , अमृतकलश, नित्य गुरूवाणी, श्री रामकृष्ण उवाच, सद्गुरू संवाद ) ग्रंथसंपदा प्रसाराचे कार्य करणार आहेत. परम पूज्य सद्गुरूंच्या कृपेने अहिल्यानगर , सावेडी येथे वेदांत विद्यापीठ आणि भव्य श्री दत्तक्षेत्र उभारण्यात आले आहे. या वैदिक कार्यात धुळे व शिरपूर येथील सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रसार सेवा समिती श्री.सद्गुरू सत्संग मंडळ, धुळे जळगांव तर्फे करण्यात आले.यासाठी गजानन बयाणी, जळगांव  रोहिदास पाटील,धुळे,हेमंत देवळे,धुळे, सुभाष चौधरी, जळगांव , राहुल इंगळे, जळगांव संपर्क साधावा.

Popular posts from this blog

समाजकल्याण विभागातील नोकरीचे आमिष ; ९ लाख ७५ हजारांचा गंडा !

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची मागणी.