समाजकल्याण विभागातील नोकरीचे आमिष ; ९ लाख ७५ हजारांचा गंडा !
समाजकल्याण विभागातील नोकरीचे आमिष ; ९ लाख ७५ हजारांचा गंडा जनसंघर्ष न्यूज नाशिक | पंचवटी : समाजकल्याण विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेकडून तब्बल ९ लाख ७५ हजार रुपये उकळून बनावट नियुक्ती आदेश देत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पंचवटी परिसरात समोर आला आहे. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्यांची नक्कल असलेला बनावट आदेश आणि कागदपत्रे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रोहिणी भडांगे (रा. बोऱाडे मळा, मखमलाबाद) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीनुसार, संशयितांनी आपसात संगनमत करून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले आणि टप्प्याटप्प्याने तब्बल ९ लाख ५७ हजार रुपये घेतले. त्यानंतर बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी अर्चना बापूराव जगताप आणि संभाजी पवार बापूराव जगताप, जमीर मुलाणी, दिलावर इलाही मुल्ला, श्वेता मगर, अतुल शेंडगे तसेच त्यांच्या अन्य साथीदा...